हिंगोलीत विवाह संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन
कोरोनामुळे कुशल आणि अकुशल कामगारांना बसला मोठा आर्थिक फटका
हिंगोली : यावर्षी कोरोनामुळे कुशल आणि अकुशल कामगारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आज हिंगोली मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विवाह संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
कोरोनामुळे कुशल आणि अकुशल कामगारांना मोठा फटका बसला आहे. रोजगार नसल्यमुळे सर्वजण आर्थिक संकटात सापडले आहेत. उदरनिर्वाह करावा तरी कसा? व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे आज हिंगोली मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विवाह संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.यामध्ये सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये,मंडप, लॉन मंगल कार्यालय, 500 लोकांमध्ये लग्न किंवा सामाजिक कार्य पार पाडण्याची परवानगी देण्यात यावी. अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये हिंगोली जिल्हा मंडप, साऊंड, लाइटिंग, टेंट , केटर्स , मंगल कार्यालय असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.