जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्रीय कायद्याविरोधात 2 ऑक्टोबरला धरणे आंदोलन

धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन - डॉ.कल्याण काळे

0

सुलतानपूर  :  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या  आदेशानुसार  शेतकरी व कामगारांच्या विरोधात केंद्र सरकार ने केलेल्या कायद्याला विरोध करण्यासाठी  औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक तहसील कार्यालयासमोर 2 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण व निदर्शने केली जाणार आहे  या पार्श्वभूमीवर  जिल्हा अध्यक्ष माजी आमदार डाॅ कल्याण काळे यांनी  खुलताबाद येथे मंगळवारी शासकीय विश्रामगृहात शहराचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक  घेऊन मार्गदर्शन केले.

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दोन ऑक्टोबर रोजी  औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक तहसील कार्यालयासमोर 2 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण व निदर्शने केली जाणार आहेत.  या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष माजी आमदार डाॅ कल्याण काळे  यांनी केले. केंद्र सरकारने विरोधी पक्षाचे म्हणणे न ऐकता दडपशाही मार्गाने मंजूर करून घेतलेल्या शेतकरी विरोधी कायद्यास विरोध करण्याकरिता तालुका स्तरावर मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करण्यात येणार असून ,आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता मंगळवारी शासकीय विश्राम गृहावर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. कल्याण काळे यांनी कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतल्यानंतर  ते  म्हणाले की, केंद्र सरकारने विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून न घेता दडपशाही मार्गाने व घाईघाईने तीन विधेयके मंजूर करून घेतली. ही विधेयके देशातील शेतकऱ्यांना गुलाम बनविणारे असून संपूर्ण देश भांडवलदारांच्या हातात देण्याचे कारस्थान भाजप सरकार करीत आहे. हे विधेयक शेतकऱ्यांना देशोधडीस लावणारे असून देश गुलामगिरीच्या मार्गाकडे नेण्याचे षडयंत्र रचले जात आहे, यास विरोध करण्यासाठी आता सर्वांनी गट तट विसरून एकत्र येण्याची गरज आहे.  मी त्या गटाचा, तो त्या गटाचा हे सारे गटतट विसरून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. जर याबाबत आपण गाफिल राहिलो तर आपल्याला गुलाम बनण्यास वेळ लागणार नाही हे समजून घेतले पाहिजे. माझे कोणतेच गट नसून मी सोनिया गांधी गटाचा आहे. जिल्ह्यात माझ्या गटाचा कोणताच कार्यकर्ता राहणार नसून आपण सर्व एकाच गटाचे आहोत  हे लक्षात ठेवले पाहिजे.

या बैठकीस जिल्हा अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, प्रदेश काॅग्रेस कमेटीचे सदस्य रविंद्र काळे, खुलताबादचे नगर अध्यक्ष एस ए  खमर, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अनिल श्रीखंडे ,काँग्रेस.प्रदेश कमिटी सदस्य आबिद जहागीदार , जगन्नाथ खोसरे, जहागीरदार , वसंत नलावडे ,सुरेश जाधव, शहराध्यक्ष समद टेलर, सुरेश चव्हाण,  सेवादल यंग ब्रिगडचे जिल्हा अध्यक्ष निलेश पवार, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मजहर पटेल, रामलाल निंबोरे, अॅड. कैसरुद्दीन, शरफोद्दीन, मुनिबोद्दीन ,अलावोद्दीन सेठ, गंगापुर खुलताबाद विधानसभा अध्यक्ष प्रवीण निकम, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद दांडेकर, विजय भालेराव, शिजवणे, अर्थर  पटेल, अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष  लालखाॅ पटेल, इ. अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी किरण पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तसेच अनिल श्रीखंडे ,आबिद जहागीरदार वसंत नलावडे ,कैसरुद्दीन,  एस एम खमर यांची भाषणे झाली.  सत्यनारायण दादे यानीं उपस्थिततांचे आभार मानले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.