धनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, जयंत पाटील म्हणाले….

या दोन्ही प्रकरणांत सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही - जयंत पाटील

0

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. प्रामुख्याने जयंत पाटील यांना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाबाबत विचारण्यात आले. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर मी काही बोलणार नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे”.

मला वाटते नवाब मलिक यांच्याबाबत त्यांच्या जावयाने केलेली एखादी चूक असेल, केली की नाही ते माहिती नाही. ते चौकशीदरम्यान कळेल. पण त्यांच्या सासऱ्यावर परिणाम होण्याचे काही कारण नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत जो अर्ज त्या महिलेने केला आहे, त्याबाबत प्राथमिक माहिती घेऊन, आवश्यक त्या गोष्टी होतील. या दोन्ही प्रकरणांत सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.भाजप नेते कशा भूमिका मांडतात हे सर्वांना माहिती आहे. ते राजीनामा मागू शकतात. जावयाने गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. सरकारी हस्तक्षेप कुठल्याही गोष्टीत‌ होत‌ नाही. सर्व सामान्य लोकांना आता‌ माहिती‌ झाले आहे. केंद्र सरकार त्यांच्या संस्था‌विरोधकांना नामोहरण करण्यासाठी वापरल्या‌ जात आहेत, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.

पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवर भाष्य

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे? त्याबाबत काय सांगाल असे जयंत पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर जयंत पाटील यांनी “माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही” असे म्हणत केवळ एका ओळीत उत्तर दिले. कोंडी झाली आहे. हे संपूर्ण प्रकरणच खळबळजनक असल्यामुळे सध्या प्रसारमाध्यमांकडून धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. प्रसारमाध्यमांचा हा ससेमिरा टाळण्यासाठीच धनंजय मुंडे प्रत्येक ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेत आहेत. गुरुवारी पहाटेदेखील मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून ‘चित्रकूट’ बंगल्यावर आले.

शरद पवार काय भूमिका घेणार?

एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले असताना, दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. शरद पवार यांचा शब्द हा फक्त राष्ट्रवादीतच नव्हे तर आता महाविकास आघाडीतही प्रमाण मानला जातो. जर शरद पवारांनी कडक भूमिका घेतली तर धनंजय मुंडेंचे मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत. धनंजय मुंडेंना पायउतार होऊन येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल, जर निर्णय झालाच, तर चौकशीलाही सामोरे जावे लागेल. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर दोन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले होते. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचे पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला सर्व माहिती आहे” असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.