धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने टी.व्ही.सेंटर येथे ‘धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन’ साजरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार आणि तथागत भगवान गौतम बुद्धांना पुष्प वाहून अभिवादन
औरंगाबाद : औरंगाबाद येथील टी.व्ही सेंटर हडको येथे धम्मचक्र अनुप्रवर्तक दिनानिमित्त धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा भंते करूनानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार ता. 25 आँक्टाेबर राेजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून आणि तथागत भगवान गौतम बुद्धांना पुष्प वाहिले आणि अभिवादन करण्यात आले.
औरंगाबाद येथील टी.व्ही सेंटर हडको येथे धम्मचक्र अनुप्रवर्तक दिनानिमित्त धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा भंते करूनानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार ता. 25 आँक्टाेबर राेजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून आणि तथागत भगवान गौतम बुद्धांना पुष्प वाहिले आणि अभिवादन करण्यात आले. यावेळी भंते करूणानंद थेरो यांनी त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. भंते करूनानंद थेरो यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तक दिन याबद्दल मार्गदर्शनपर संवाद साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्यात आले. या कार्यक्रम यशस्वीतेकरिता अध्यक्ष दिलीप रगडे, कार्याध्यक्ष प्रकाश सोनवणे, सचिव एकनाथ पाखरे, उपाध्यक्ष मिलिंद दाभाडे, प्रवक्ते विलास पांडे, कोषाध्यक्ष सुनील खरात, निमंत्रक रमेश वानखडे ,संघटक संतोष सोनवणे ,उत्तमराव तांबे , उत्तमराव जाधव, पंडितराव तुपे ,सुमेध डोके, प्रकाश पाखरे, अनिकेत दांडगे ,शुक्लोधन दाभाडे ,रमेश पाटील, नरेंद्र दांडगे, मुरलीधर गंगावणे, अॅड. चंद्रकांत हिवराळे, नवीन साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप धम्म पालन गाथा घेऊन झाला. यावेळी बौद्ध उपासक, उपासिका आणि परिसरातील नागरिकांची माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती.