उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
पुन्हा एकदा अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली. मात्र त्यांना कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. आता पुन्हा एकदा अजित पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह अला आहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली. मात्र त्यांना कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. आता पुन्हा एकदा अजित पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. अजित पवारांनी शनिवारी 18 ऑक्टोबरला अतिवृष्टी झालेल्या बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पुरामुळे बाधित झालेले रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार होता. मात्र अजित पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलल्याची माहिती आहे.