लॉकडाऊनविरोधात ‘वंचित बहुज आघाडी’ आक्रमक

राज्यभरात 12 ऑगस्टला 'डफली बजाव' आंदोलन; अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

0

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप काही ठिकाणी लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  लॉकडाऊन विरोधात आता वंचित बहुजन आघाडी अत्यंत आक्रमक झाली आहे. लॉकडाऊनचा निषेध म्हणून वंचितकडून 12 ऑगस्ट (बुधवारी) रोजी राज्यभरात डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन विरोधात आता वंचित बहुजन आघाडी अत्यंत आक्रमक झाली आहे. लॉकडाऊनचा निषेध म्हणून वंचितकडून 12 ऑगस्ट (बुधवारी) रोजी राज्यभरात डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर बुधवारी दिवसभर डफडे वाजवण्याचा कार्यक्रम घेणार, अशी घोषणा आंबेडकर यांनी केली आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इत्यादी संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व आणि लॉकडाऊनला विरोध का आहे? हे देखील समजावून सांगावे, असेही ते म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.