शक्तिप्रदर्शन सुरू, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी

खडसेंना शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दीच जास्त असल्याचे चित्र

0

जळगाव : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हळूहळू ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. कारण जळगाव भाजपने काल बोलावलेल्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा, खडसेंना शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दीच जास्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हळूहळू शक्तिप्रदर्शन स्वरूपात ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. खडसेंना शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दीच जास्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले.  एकनाथ खडसे यांच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल होती. ही कार्यकर्त्यांची संख्या भाजपच्या पक्षबांधणीसाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा, जास्त होती असा दावा खडसे समर्थकांकडून करण्यात येत आहे. जळगावातील मुक्ताईनगर या खडसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाची पक्षबांधणीसाठी बैठक झाली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर भाजपाची ही पहिलीच पक्षबांधणीची बैठक होती. जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात मुक्ताईनगर भुसावळ, रावेर, या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. मात्र या बैठकांमध्ये स्थानिक तुरळक कार्यकर्त्यांचीच उपस्थिती होती. माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही याठिकाणी पाठ फिरवली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.