हाथरस प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी

वाल्मिकी समाज-'वंचित'आघाडीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0
औरंगाबाद : उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करावी,  अशी मागणी  करत वाल्मिकी समाज तसेच वंचित बहुजन आघाडीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी योगी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने देशभरात संताप व्यक्त होत आहे. वाल्मिकी समाजाने योगी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. या घटनेमुळे वाल्मिकी समाजात प्रचंड संताप व्यक्त  होत असल्याने योगी सरकारने राजीनामा द्यावा, अशीही जोरदार मागणी यावेळी समाज बांधवांनी केली.
वंचित बहुजन आघाडीनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. योगी सरकारच्या राज्यात उच्चवर्णीयांचे अत्याचार वाढले आहेत. मागासवर्गीय समाज भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचा आरोप  करण्यात आला. तरुणीवर बलात्कार आणि हत्या केल्यानंतर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला नाही. संघटनांचा दबाव आल्यानंतर योगी सरकार हलले, योगी सरकारने संविधानाशी द्रोह केल्याचे आरोप वंचित बहुजन आघाडीने केला . याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी आघाडीचे शहर उपाध्यक्ष भगवान खिल्लारे, समाधान खिल्लारे, विनोद गायकवाड, संजय जाधव, राहुल गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.