कोरोना लसीकरणासाठी कोल्ड चैन आणि मनुष्यबळाचा खर्च केंद्राने देण्याची मागणी : राजेश टोपे

पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यांत पूर्ण होण्याचा अंदाज

0

औरंगाबाद :कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च हा केंद्र सरकारने करायला हवा अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. शिवाय एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरनाला मान्यता द्यावी अशी मागणीही राजेश टोपे यांनी केली.

कोरोना लसीकरणासाठीच्या कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या टप्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ८ जानेवारीला राज्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होत आहे. कोरोनाच्या  दोन लसींना देशात मान्यता मिळाली. काही दिवसांमध्ये लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची लस मोफत मिळणार की पैसे द्यावे लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रातील ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबवणार आहे. राज्यात चार जिल्हे वगळून ड्राय रन होणार आहे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रातील ३० जिल्हे , २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबवणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांत  तीन आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये एक आरोग्य संस्था याठिकाणी हा ड्रायरन घेण्यात येईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.