ख्रिसमस सजावटीच्या साहित्याना बाजारात मागणी !
औरंगाबाद : दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या नाताळ सणासाठी बाजार पेठा सजल्यात.ख्रिसमस ट्री , चॉकलेट विविध आकाराचे केक,बेल अश्या सजावटीच्या वस्तू खरेदी साठी बाजार पेठात गर्दी होत आहे. नाताळ म्हणजे प्रभू येशूचा जन्म दिवस साजरा केला जातो त्यासाठी ख्रस्ती धर्म ग्रंथ , चर्च याच्यावर विविध प्रकारे आकर्षक विधुत रोषणाई केली जाते.लहान मुलांना प्रामुख्याने आकर्षण असते संताक्लाज चे त्यासाठी खूप सुदंर प्रतिकृती बाजारात त्याची 200 रुपये पासून आहे.तसेच शोभेच्या वस्तू,सजावटी सामान संताक्लाज टोपी,फ्लोरा,बेल,बॅनर याची मागणी वाढली आहे. चॉकलेट संताक्लाज केक याची नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. ख्रिसमस क्रिनवलला नागरिक व मुलांनी गर्दी करत त्याचा आनंद लुटला.