नाव औरंगाबादचे बदलायची मागणी, तुम्ही बदलले विमानतळाचे, मग मुख्यमंत्रीऐवजी सरपंच म्हणू का?

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करा, अशी आमची मागणी होती”, - नितेश राणे

0

सिंधुदुर्ग : ठाकरे सरकारवर भाजप आमदार नितेश राणे यांनी  हल्लाबोल केला. “आम्ही औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव दिले.

ठाकरे सरकारवर भाजप आमदार नितेश राणे यांनी  हल्लाबोल केला. “आम्ही औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव दिले. जर तसे असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केले असते तर चालले असते का? मर्द असाल तर वडिलांचे स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला. औरंगाबादच्या नामांतरावरुन उफाळलेल्या वादावर नितेश राणेंनी जोरदार प्रहार केला. “शिवसेनेची लायकी नामकरण प्रकरणावरुन कळली आहे. सेनेला महाविकास आघाडीमध्ये काडीची किंमत नाही”, असे नितेश राणे म्हणाले.

शेतकरी आंदोलनावरून काँग्रेसवर साधला निशाणा

नितेश राणेंनी दिल्लीतील काँग्रेस आंदोलनावरून काँग्रेसवर निशाणा साधला. “विरोध कुठे आणि काशासाठी होतो हे महत्त्वाचे आहे. विरोध करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे हित साधायचे आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या रॅलीमध्ये लोकांना बोलवावे लागत नाही. कोकणातील शेतकरी कृषी कायद्याचे स्वागत करत आहेत. काँग्रेसने 2019 च्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला. काँग्रेस बोलत राहिले, पण पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले, असे नितेश राणे म्हणाले. शेतकरी संघटना आतून या कायद्याला समर्थन देत आहेत. राज्यात या कायद्याबाबतीत राष्ट्रवादीची भूमिका काय? शिवसेनेला कायदे कळले तरी आहेत का? काँग्रेसला फक्त विरोध करायचा आहे. राहुल गांधी वायनाडमधून निवडून येऊ शकतात, मग कोकणातील शेतकरी बाहेर माल का विकू शकत नाही? असे सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.