पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांना पराभवाचा धक्का

आदर्श सरपंच भास्कर पेरेंना कसे हरवले? कपिंद्र पेरे म्हणतात…..

0

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव समजल्या जाणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
पाटोद्यातील लोकशाही ग्रामविकास पॅनेलने येथे दणदणीत विजय मिळवला. यावेळी या पॅनेलने भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव केला.

राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळवत गावाचे नाव राज्यभर लौकिक करणार्‍या माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पाटोदा गावात सत्‍तांतर झाले. गेल्या पंचवीस वर्षांपासून औरंगाबादमधील पाटोदा गावाला राज्यभर ओळख देणारे विकास पुरुष भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपुर्वी गावच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. आदर्श गाव समजले जाणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पाटोद्यातील लोकशाही ग्रामविकास पॅनेलने येथे दणदणीत विजय मिळवला. यावेळी या पॅनेलने भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील यांचाही पराभव केला. हा पराभव केल्यानंतर अनुराधा पेरे पाटील यांनी लोकशाही मध्ये हार-जीत होत असते यापुढेही मी नव्या जोमाने काम करेन, असा विश्वास व्यक्त केला.  आदर्श गावचे आदर्श सरपंच, अशी ओळख असलेले भास्कर पेरे हे उमेदवार नव्हते. या गावात यंदा त्यांचे पॅनेलही नव्हते. त्यांची मुलगी अनुराधा ही अपक्ष निवडणूक लढवत होती. त्यांचा पराभव झाला. भास्कर पेरे यांच्या मुलीचा पराभव म्हणजे भास्कर पेरेंचाच पराभव, अशी चर्चा पंचक्रोशीत आहे. मात्र विरोधी पॅनेलचे प्रमुख कपिंद्र पेरे यांनी हा भास्कर पेरेंचा पराभव नाही, असे म्हणाले. विरोधी पॅनलचा विजय नेमका कसा झाला, याबाबत कपिंद्र पेरे यांनी सांगितले. कपिंद्र पेरे म्हणाले, “हा भास्कर पेरे पाटलांचा पराभव नाही, हा तरुणांचा विजय आहे. भास्कर पेरे पाटलांनी पूर्ण पॅनेल उभे केले नव्हते, मुलगी उभी होती. ती अपक्ष होती”.भास्कर पेरे पाटील हे 25 वर्षे सरपंच राहिले, तरीही मुलीचा पराभव झाला, याबाबत कपिंद्र पेरे म्हणाले, ते लोकांचे मत आहे. बदल हा गरजेचा असतो, त्यानुसार हा बदल झाला. भास्कर पेरे यांना निष्क्रिय म्हणता येणार नाही, असे कपिंद्र पेरे यांनी आवर्जून सांगितले. हे गाव शंभर टक्के आदर्श राहील, तरुण पिढी चांगले काम करुन दाखवेल, आम्ही सर्वांना सोबत घेऊ, असा विश्वास कपिंद्र पेरे यांनी व्यक्त केला. भास्कर पेरे पाटील यांचे स्थान पूर्वी होते तसेच राहील, त्यांचे मार्गदर्शन घेऊ, त्यांनी दिले तर चांगले होईल, त्यांच्या विचाराने वाटचाल करू, असेही कपिंद्र म्हणाले.

11 पैकी 8 जागा बिनविरोध

या वर्षी पोटोदा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चेत होती. कारण यावेळी भास्करराव यांच्या विरोधात पॅनल उभे केले होते. या ग्रुप ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ११ असून कपिंद्र कैलास पेरे यांनी या निवडणुकीत लोकशाही ग्रामविकास पॅनल उभे करुन पूनम नागेश गाडेकर, बबाबाई कैलास पेरे, कपिंद्र पेरे, लक्ष्मण मातकर, श्यामल भारत थटवले, छाया गोरख पवार, सुनीता कृष्णा पेरे, पुष्पा सोमिनाथ पेरे हे आठ सदस्य बिनविरोध निवडून आणले होते. तर उर्वरित तीन जागांसाठी सरळ लढत होऊन लोकशाही ग्रामविकास पॅनलच्या मंदा दुर्गासिंग खोकड, जयश्री किशोर दिवेकर व मीरा शिवाजी जाधव या निवडून आल्या.  तब्बल 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनलचा विजय झाला.

पुष्पा पेरे म्हणाल्या, ‘ती माझीच मुलगी’
निवडणुकीत कपिंद्र पेरे यांच्या पॅनेलकडून पुष्पा पेरे यांनी विजय मिळवला. याबाबत पुष्पा पेरे म्हणाल्या, “मी पाच वर्षे सदस्या होते, अनुराधा ही माझीच मुलगी, ती जिंकली काय आणि मी जिंकली काय, यामध्ये कोणाचा पराभव नाही. पाच वर्षांत कामे झाली, आता आणखी चांगली कामे करू”
पाटोद्यात भास्करराव पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे यांचा पराभव झाला. त्यांना निवडणुकीत 186 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी दुर्गेश खोकड यांनी 204 मते मिळवत निवडणूक जिंकली. अनेक वर्षांपासून भास्करराव पेरे यांनी पाटोदा ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवली. या काळात त्यांनी पाटोदा गावाचा विकास करून गावाची किर्ती समस्त राज्यात पसरवली. त्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. मात्र, यावेळच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भास्कर पेरे 30 वर्षांनंतर गावाच्या राजकारणातून निवृत्त झाले आहेत. माझे वडील भास्करराव पेरे यांनी गावात अनेक विकासकामे केली आहेत. मात्र माझ्यात विकासकामे करण्याची क्षमता गावकर्‍यांना वाटत नसावी म्हणून माझा पराभव झाला असावा. मतदारांचा कौल हा मला मान्य आहे, असे अनुराधा पेरे म्हणाल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.