दीपिका पदुकोण ‘एनसीबी’ कार्यालयात दाखल, चौकशी सुरू

दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या तिघींचीही चौकशी होणार

0

मुंबई : सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज अँगलसमोर आला. हे ड्रग्ज कनेक्शन प्रकरण बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींपर्यंत पोहोचले आहे. आज दीपिका पदुकोण , सारा अली खान , श्रद्धा कपूर  या तिघींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून चौकशी केली जाणार आहे.

दीपिकाला शनिवारी सकाळी 10 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला 10.30 वाजता चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. सारा अली खानच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, साराचीही आज ‘एनसीबी’कडून चौकशी केली जाणार आहे. दीपिका रात्रभर घरी नव्हती, रात्रभर एका हॉटेलमध्ये वास्तव्यास, मीडियाला गुंगारा देत एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली.तर दुसरीकडे धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद यांची 20 तासांपासून चौकशी सुरू  आहे. त्याशिवाय शुक्रवारी (25 सप्टेंबर) अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसह दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना एनसीबीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान दोघींकडूनही अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी बनवलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपची  ‘अॅडमिन’ दीपिका स्वतः असल्याचे, करिश्माने ‘एनसीबी’ला सांगितले. त्यामुळे आता दीपिकाच्या अडचणींत वाढ झाली आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्मा हिला आज पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यावेळी दीपिका पदुकोण आणि करिश्मा प्रकाश यांची समोरासमोर बसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. काल करिश्मा आणि रकुल प्रीत सिंहची एकत्र चौकशी करण्यात आली होती. तर निर्माता क्षितिज प्रसाद यांनी चौकशीत अनेक मोठ्या नावांचा खुलासा केला आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. रकुल प्रीत सिंहने चौकशीदरम्यान क्षितिज प्रसादचे नाव घेतले होते. क्षितिज अनेकांना ड्रग्ज उपलब्ध करुन देण्याचे काम करायचा, असे रकुल प्रीतने सांगितले आहे.  या सर्व प्रकरणानंतर चित्रपट दिग्दर्शक करण जोहर याने एक पत्रक जारी केलं आहे. ‘माझ्या घरात ड्रग्स पार्टी झाली नाही. माझ्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत. क्षितिज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा यांचा धर्मा प्रॉडक्शनशी काहीही संबंध नाही’, असे करण जोहर स्पष्ट केले आहे.

सुशांत प्रकरणात ‘एनसीबी’कडून दोन एफआयआर दाखल

सुशांत प्रकरणात ‘एनसीबी’ने आतापर्यंत दोन एफआयआर दाखल केल्या आहेत. तर याच प्रकरणात रिया चक्रवर्ती  शौविक चक्रवर्ती आणि ड्रग्ज तस्करांच्या चौकशीदरम्यान ज्यांची नावे समोर आली आहेत त्यांनाही ‘एनसीबी’कडून समन्स बजावण्यात आले आहेत. 50 बॉलिवूड सेलिब्रिटी सध्या एनसीबीच्या रडारवर आहेत. यात अनेक प्रसिध्द अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि बी-ग्रेड चित्रपटाच्या निर्मात्यांची नावे असल्याचे म्हटले जात आहे. जया साहाच्या चौकशी दरम्यान दीपिका पदुकोण, सिमॉन खंबाटा  आणि करिश्मा प्रकाश यांची नावे समोर आली आहेत. तर, रकुलप्रीत सिंह आणि सारा अली खान यांची नावे रिया चक्रवर्तीने घेतली होती. यापैकी करिश्मा प्रकाश दीपिका पदुकोणची मॅनेजर असून, तिने दीपिकासाठी ड्रग्जची सोय केली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.