‘मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा’,’स्वाभिमानी’ युवती आघाडीचा रास्ता रोको

 परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास , नुकसान भरपाईची मागणी

0

बीड : परतीच्या पावसामुळे  शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’च्या युवती आघाडीकडून करण्यात आली आहे. स्वाभिमानी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रास्ता रोको करण्यात आला.

पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’च्या युवती आघाडीकडून करण्यात आली आहे. स्वाभिमानी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रास्ता रोको करण्यात आला. ‘मुख्यमंत्री जागे व्हा, मुख्यमंत्री न्याय द्या’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसंच सरसकट पीकविमा द्या अशी मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी मागणी मान्य न झाल्यास ज्याप्रमाणे पावसानं शेतकऱ्यांना झोडपलं, तसंच सरकारलाही झोडपू, असा इशारा यावेळी स्वाभिमानी युवती आघाडीनं दिला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान केलं. कुठे काढणी झालेल्या सोयाबीनच्या हुंडी वाहून गेल्या. तर कुठे सोयाबीनला जागेवरच बुरशी लागली. अनेक भागात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं उभा ऊस आडवा झाला. फुलं, फळबागांचं मोठं नुकसान झालं. भात शेती पुर्णता नष्ट झाली. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर वाया गेललं पीक पाहत अश्रू ढाळण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.