नाशिकमधील शाळा सुरू की निर्णय पुढे ढकलावा, उद्या तातडीची बैठक : छगन भुजबळ

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांचा विरोध,,संमतीपत्र द्यायला हरकत

0

नाशिक : नाशिकमधील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा याबाबत तातडीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरु करण्याची मुभा राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला दिली आहे.
“आम्ही नाशिकमधील शाळांच्या बाबतीत उद्या बैठक घेऊन चर्चा करू. त्यानंतर निर्णय घेणार आहोत. मुलांना शाळेत पाठवायला पालकांची संमती मिळते की नाही, तेही बघितलं पाहिजे. याबाबत मंत्रिमंडळात वेगवेगळी मतमतांतरे नक्कीच आहेत. आपल्या डोक्यावरची टांगती तलवार आपल्या मानेवर पडता कामा नये” अशी भीती भुजबळांनी व्यक्त केली.

“जगातील अनेक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांचा विरोध आहे. पुन्हा त्सुनामीसारखी कोरोनाची लाट येऊ शकते. त्यामुळे संमतीपत्र द्यायला पालक तयार नाहीत. सरकार जबाबदारी ढकलत नाही. मात्र कोव्हिडची लागण होणार नाही, अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. म्हणून स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा आहे” असं भुजबळ म्हणाले.

“आता जगभरात कोरोनाची जी दुसरी लाट येत आहे, ती पूर्वीपेक्षा भयंकर आहे. लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा येऊ देऊ नका,” असे भुजबळांनी सांगितले. “आजपासून रेमडिसिव्हर वापरू नका, असे सांगितले आहे. आता सगळे उपलब्ध आहे तर म्हणतात की, वापरू नका” असेही भुजबळ म्हणाले.“नाशिकमध्ये कोव्हिड मृत्यूदर सर्वात कमी आहे. याचे श्रेय व्यासपीठावर बसलेल्या अधिकाऱ्यांना आहे. मागणीपेक्षा पाचपट जास्त ऑक्सिजन आज नाशिकमध्ये उपलब्ध आहे. आपण परिस्थिती नियंत्रणात आणली. दसरा, दिवाळीला बाजारांमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळाली, नो मास्क नो एन्ट्रीसारखे उपक्रम महत्वपूर्ण ठरले. लॉकडाऊन काळात पोलिस रस्त्यावर उभे राहिले. यामुळे अनेक पोलिसांना लागण देखील झाली, असेही भुजबळांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.