शिवना येथील खंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाचीच उदासीनता
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे तब्बल सत्तेचाळीस हजाराचे वीजबिल थकल्याच्या कारणामुळे महावितरणने येथील आरोग्य उपकेंद्राचा वीजपुरवठा दहा दिवसापूर्वी खंडित केला आहे.
त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या महिलांना अजिंठा किंवा सिल्लोड येथे रेफर करण्याचा सपाटा सुरू झाला आहे.महावितरणने दाखविलेली सहकार्याची भावना आरोग्य विभागाला पचनी पडलेली नाही.परिणारी गरीब रुग्णांना नाहकाचा त्रास सहन करावा लागत आहे.
दरमहा पंधरा ते सतरा गर्भवती महिला प्रसूतीसाठी आरोग्य उपकेंद्रात आणल्या जातात.याच ठिकाणी उपचार देऊन तात्पुरता औषाध उपचार व सेवा पुरविल्या जातात. मात्र गेल्या दहा दिवसांपासून येथील वीजपुरवठा खंडित असल्याने रुग्णांना अजिंठा किंवा सिल्लोडला रेफर केले जात आहे.अशा आणीबा णीच्या वेळी उपचाराअभवी गर्भवती महिलेच्या प्रकृतीसंबंधी चिंता व्यक्त केली जात आहे.
या आठवड्यातही आठ ते दहा महीलांची प्रसुतीची वेळ आहे मात्र विद्युत पुरवठा खंडित असल्याने व उपकेंद्रावर राहणाऱ्या आरोग्य सेविका गेल्या आठ दिवसांपासून पाणवडोद ते शिवना ये जा करीत असल्याने रूग्णांना रात्री अपरात्री त्रास सहन करावा लागत आहे लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.