दौलताबाद म्हणजेच ‘देवगिरी’, यादव राजवटीची पहिली राजधानी

आज देवगिरी किल्ल्याला तब्बल ८३३ वर्षे पूर्ण, या अभेद्य किल्ल्यावरून कुशल नेतृत्वाची धुरा 

0

औरंगाबाद :  शहरापासून जवळच असलेल्या दौलताबाद किल्ला म्हणजेच ‘देवगिरी’ होय. यादवांची राजधानी मानल्या जाणाऱ्या देवगिरी किल्ल्याला तब्बल ८३३ वर्षे पूर्ण झाली. आज पहाटे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी निसर्गाच्या हिरवाईने नटलेला आणि मनोहरी दृश्याने जणू साज चढला आहे.
औरंगाबादला यंदा सुरुवातीच्या तीन महिन्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाल्यामुळे हा देवगिरीचा किल्ला टॉप टू बॉटम हिरवाईने नटलेला दिसतो आहे. मध्यकालीन भारताची मजबूत राजधानी मानल्या जाणाऱ्या देवगिरी किल्ल्यावर स्वातंत्र्याची पहाट अधिकच चैतन्यमय वाटत होती. अभेद्य किल्ल्यावरून कुशल नेतृत्वाची धुरा  होती.  राजा भिल्लम यादवांनी स्वत:ला राष्ट्रकुटांपासून स्वतंत्र घोषित करून इ. स. ११८७ ते ११९१ या कालावधीत ‘देवगिरी’ म्हणजे आजच्या दौलताबाद किल्ल्याला यादव राजवटीच्या पहिल्या राजधानीचा दर्जा दिला होता. तुघलक याने चक्क दिल्लीवरून भारताची राजधानी दौलताबाद किल्ल्यावर आणली. दौलताबाद ही ११ महिने भारताची राजधानी होती. राजधानीचा मोठा बहुमान या किल्ल्याने मिळवलेला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.