कृषीमंत्रिपद सोडण्यास दादा भुसे तयार! …शिवसेना खडसेंसाठी सोडणार कृषीखाते?

मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा सुरु आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य

0

मालेगाव : एकनाथ खडसे यांनी भाजपला राम-राम ठोकल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा  आहे.  मंत्रिमंडळात फेरबदल करुन शिवसेनेच्या कोट्यातील कृषीमंत्रिपद खडसेंना दिले जाणार ,अशी चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आपण कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार आहोत. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आपल्याला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. दरम्यान, जनतेशी थेट संपर्कात असणारं शिवसेना कृषी खाते सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळतेय.

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार आहेत. ते जो निर्णय घेतील, जो आदेश देतील त्याचे पालन करणे हे शिवसैनिकाचे काम आहे आणि दादा भूसे एक शिवसैनिक आहे’, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांचा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे की नियोजन मंडळावर त्यांची वर्णी लावायची, याबाबत महाविकास आघाडीत संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना कृषीमंत्रिपद सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडही आपल्याकडील गृहनिर्माण खाते खडसेंना देण्यास तयार नसल्याचे कळते. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचा सर्वात मोठा शत्रू सध्या भाजप आहे. त्यामुळे भाजपला नामोहरम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवरही दबाव टाकू शकतो. शिवसेनेला कृषी खाते सोडायला लावून, तिथे खडसेंची वर्णी लावली जाऊ शकते,  दरम्यान ,शिवसेना अडून बसली तर मध्यम मार्ग म्हणून नियोजन मंडळावर खडसेंना घेतले जाईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.