नेमबाजीत श्रेयसीने मिळवले सुवर्णपदक, भारताची पदक ‘भरारी’ सुरुच

0

वेटलिफ्टर्सनंतर आता नेमबाजीमध्येही भारताने पदकांची ‘भरारी’ घेण्यास सुरुवात केली आहे. नेमबाज श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णवपदक मिळवले आहे. तसेच पुरुषांच्या डबल ट्रॅपमध्ये अंकुर मित्तलने कांस्यपदक पटकावले आहे.

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या खात्यात तब्बल 24 पदके आली आहेत. यापूर्वी नेमबाज ओम मिथरवालने 50 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. ओम मिथरवालने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकाचवेळी दोन पदके मिळवले आहेत. तसेच महाराष्ट्राची हिना सिद्धू हिनेदेखील यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले आहेत.

भारताने आतापर्यंत 24 पदके मिळवली असून 12 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कांस्य पदकांची कमाई केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.