CWG 2018 : भारताच्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने पटकावले सुवर्णपदक

0

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवले आहे. 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये 196 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे.

वेटलिफ्टर गुरुराजाने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली आहे. गुरुराजाने रौप्यपदक पटकावून भारताचे खाते उघडले आहे. तसेच राष्ट्रकुल क्रिडे स्पर्धेत भारताची बॅडमिंटनमध्ये विजयाचा झेंडा फडकावला आहे. बॅडमिंटनमध्ये भारताने श्रीलंकेचा 5-0 ने पराभव केला आहे. मात्र भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

ऑस्ट्रेलिया येथे 21 व्या कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात झाली आहे. बुधवारी या स्पर्धेचे धमाकेदार उद्धाटन झाले.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.