भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंसह 9 जणांवर गुन्हा

'दार उघड उद्धवा, दार उघड' म्हणत राज्यात मंदिरे सुरूच्या मागणीसाठी आंदोलन

0

उस्मानाबाद : ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीनं पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे, पोलिसांनी भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शासकीय आदेशाचे पालन न करणे, कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणे यानुसार तुळजापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे प्रशासन व भाजप अध्यात्मिक आघाडीचे आंदोलक यांच्यात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात कालपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेल्याचा आरोप तुषार भोसले यांनी केला आहे. साधू-संतांचा आवाज ऐकायला हे सरकार तयार नाही. साधू-संतांशी चर्चा करा म्हणून दोन वेळा पत्र पाठवली. पण हे सरकार झोपी गेल्याचं सोंग आणत आहे, अशी टीका तुषार भोसले यांनी केली. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटीलही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

राज्य सरकारने सिनेमागृह, जलतरण तलाव आदींना परवानगी दिली. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार यापूर्वीच सुरू झाले आहेत. अशावेळी राज्यातील मंदिरे बंद का? असा सवाल भाजप, विविध मंदिर समित्या आणि राज्यभरातील साधू-महंतांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यभर थाळीनाद आंदोलन केले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजून मंदिरे सुरु करण्याची भाजपची मागणी मान्य केलेली नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.