मेंढपाळ चुलत्या-पुतण्यावरील हल्ल्यात चुलत्याचा मृत्यू

धनगर समाज आक्रमक, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेकवाईकांनी नकार

0
 जालना : भोकरदन तालुक्यातील .निपाणी चिंचोळी येथील  मेंढपाळ चुलत्या- पुतण्यावर  झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात चुलत्याच्या मृत्यूनंतर धनगर समाज आक्रमक झाला असून आरोपींना तात्काळ अटक करा, मृताच्या नातेवाईकांना शासकीय मदत देऊन नोकरीत सामावून घेण्याचे  ठोस आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेकवाईकांनी नकार दिला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात तणाव निर्माण झाला.
 निपाणी येथे 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत दोघांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान  साडेतीन वाजेच्या सुमारास  जखमी  रामदास यांचा मृत्यू झाला. रामदास कडूबा जोशी वय-40 (रा.निपाणी चिंचोळी, ता.भोकरदन, जि. जालना) असे मृताचे नाव आहे तर योगेश जोशी असे जखमी पुतण्याचे नाव आहे.  त्यानंतर धनगर समाजाचे राज्यातील अनेक नेत्यांनी औरंगाबाद गाठले आज सकाळपासून घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गुहासमोर मोठ्या प्रमाणात समाजबांधवांनी घोषणाबाजी केली. मेंढपाळांना शस्त्र परवाना देण्यात यावा, हल्‍ला करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करावी, मृताच्या नातेवाईकांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,  या सर्व मागण्या ठोसपणे जोपर्यंत  मान्य होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. दुपारपर्यंत पोलिस आंदोलक आणि नातेवाईकांची समजूत घालत होते. या वेळी रामनाथ मंडलिक, सुरेश कांबळे, शशिकांत तरंगे, रामभाऊ लांडे, संदीप घोगरे, संजय तागड, सुरेश डोळझाके, शैलेश लबाडे, रंगनाथ राठोड, संजय फंटागडे, कैलास रिठे, दिलीप रिठे  यांच्या सह समाज बांधवांची उपस्थिती होती.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.