…या रक्तगटाचे व्यक्ती आहेत ‘कोरोना’चे सर्वात जास्त शिकार

0

मुंबई :कोरोनानं सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशात सध्या 130च्या वर कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत 3जणांचा कोरोनामुळं मृत्यु झाला आहे. ज्या व्यक्तींचा रक्तगट A आहे त्यांना कोरोनापासून धोका असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

अलीकडेच वुहानमध्ये वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस नेमका कशामुळं होतो हे शोधण्यासाठी सुमारे 2173कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या लकांचा अभ्यास केला आहे. विशिष्ट रक्तगटातील व्यक्तीलाच हा आजार लवकर होतो. इतर रक्तगटातील व्यक्तींना त्याचा जास्त त्रास होत नाही.

एका ब्रिटिश वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार, हुबेई प्रांतातील 3रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रूग्णांमध्ये 206 लोकांचा बळी गेला. आश्चर्य म्हणजे यापैकी 85 जणांचा रक्तगट A होता.

2173 संक्रमित लोकांवर शोध लावला होता त्यापैकी 38टक्के लोक A रक्तगटाचे आहेत हे आढळून आले. त्यांच्यामध्ये O रक्तगटाचेही लोक होते त्यांना याचा कोरोना व्हायरसची कमी त्रास झाला होता. फक्त 26टक्के लोकांनाच कोरोनाची लागण झाल्याच आढळलं आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.