लातूरमध्ये कोरोनाग्रस्त तरुणीला भावाची मारहाण
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाने मारहाण केल्याचा आरोप
लातूर : कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घ्यायला आलेल्या तरुणीला तिच्या भावानेच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार देण्यात आली आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाने मारहाण केल्याचा आरोप आहे.
कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घ्यायला आलेल्या तरुणीला तिच्या भावानेच मारहाण केल्याची घटना घडली. लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार देण्यात आली आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाने मारहाण केल्याचा आरोप आहे. तक्रारदार तरुणीने आंतरजातीय विवाह केला होता. आई कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समजले. दोघींना कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तिथे तिने रजिस्टर मॅरेज केलेला तिचा पतीही तिला सोडायला आला होता. त्याच वेळी तिचा भाऊही पोहोचला. आंतरजातीय विवाह केल्याने चिडलेल्या तिच्या भावाने या तरुणीला मारहाण केली. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.