कोरोनाचे सावट; पहिल्यांदाच शहरातील महादेव मंदिर बंद

भक्तांच्या ओम नमः शिवायच्या गजराने शहर भक्तिशमय

0

औरंगाबाद : श्रावण महिन्याला सुरुवात मंगळवारी (ता..21) पासून झाली. आज शेवटचा श्रावण सोमवार. सर्वत्र घरोघरी शिवशंकर महादेवाचे पूजाअर्चा करून ओम नमः शिवायचा गजर केला. यंदा कोरोना महामारीचे संकट पसरल्याने इतिहासात पहिल्यांदाच शहरातील महादेव मंदिर बंद असल्याने भक्तांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेऊन समाधान मानावे लागले. आज शेवटचा श्रावण सोमवार असल्याने भक्तांनी घरीच महापूजा केली.

आज शेवटच्या श्रावण सोमवारी महिलांनी पारंपरिक पद्धतीने घरोघरी पूजा केली. यावेळी महिलांनी 108 बेलपत्र वाहून ओम नमः शिवाय चा जप केला. तसेच महापूजा, अभिषेक, सत्यनारायण पूजा करण्यात आली. यंदा पहिल्यांदाच श्रावण महिन्यात मंदिरात न जाताच पूजा करण्याची वेळ आली, अशी खंत त्यांनी व्यक्त करत हे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना करून जणकल्याणासाठी पूजा केली. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने महादेवाची पूजा करून आराधना केली जाते. यादिवशी उपवास केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरासह विविध महादेव मंदिरामध्ये भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. महाभिषेक करून बेलपत्र वाहून ओम नमः शिवायचा जयघोष करून जल्लोष करतात. परंतु यावेळी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीमुळे महादेव मंदिर बंद ठेवण्यात आले. त्यामुळे भक्तांनी दूरवरूनच महादेवाचे दर्शन घेऊन ओम नमः शिवायचा जप केला. आज सायंकाळी खडकेश्वर महादेव मंदिराच्या वतीने माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महापूजा करून आरती आली, अशी माहिती खडकेश्वर महादेव मंदिराचे पुजारी रवींद्र चौधरी यांनी सांगितले. हर-हर महादेव कावड यात्रा समितीच्या वतीने दरवर्षी श्रावण मासनिमित्ताने कावड यात्रा काढण्यात येते. ही परंपरा यंदाही कायम ठेवत आज सकाळी ’हर हर महादेव’ म्हणत हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिर ते खडकेश्वर महादेव मंदिर मार्गे कावड यात्रा काढण्यात आली. यावेळी यात्रेत रथ, ओम नमः शिवायचा गजर करत भक्तांनी सहभाग नोंदविला. यावेळी आ.अंबादास दानवे, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, राजू दानवे, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, नंदकुमार घोडेले, बंडू ओक, संतोष जेजुरकर सह आदींनी सहभाग नोंदवला. हरसिद्धी माता मंदिर आणि खडकेश्वर महादेव मंदिर परिसरात महाभिषेक करून ओम नमः शिवायचा जयघोष केला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.