हिंगोलीमध्ये कोरोनाबाधिताचे डायलिसिस, महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी

डायलिसिस विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या रूग्णसेवेचे जिल्हाभरातून कोतुक

0

हिंगोली :  हिंगोली शहरातील शासकीय जिल्हा कोरोना रुग्णालयात नव्यानेच उभारण्यात आलेल्या डायलिसिस विभागत एका कोरोनाबाधित रुग्णाचे यशस्वीपणे डायलिसिस करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णाचे यशस्वीपणे डायलिसिस करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिला यशस्वी प्रयोग आहे. त्यामुळे या डायलिसिस विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या रूग्णसेवेचे जिल्हाभरातून कोतुक केले जात आहे.

हिंगोली येथे सुसज्ज डायलिसिस विभाग सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. एरवी डायलिसिस करण्यासाठी रुग्णांना प्रत्येक वेळी औरंगाबाद, नागपूर, अकोला, नांदेड आदी ठिकाणी जावे लागत होते. मात्र हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस विभागामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत झाली आहे. असाच एक रुग्ण ज्यावर येथील डायलिसिस विभागात नियमित डायलिसिस करण्यासाठी येत असताना, सदरील रुग्णाचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला. डायलिसिस विभागातील कुशल डॉक्टर्स कर्मचाऱ्यांनी धाडसाने दोन्ही किडन्या निकामी झालेल्या रुग्णाचे यशस्वी डायलिसिस केले . या रुग्णाची प्रकृती स्थित असून, रुग्णांच्या नातेवाइकांनी डायलिसिस विभागातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली डायलिसिस विभागातील  वैद्यकिय अधिकारी डॉ. तुकाराम आऊलवार, डायलेसिस वैज्ञानिक अधिकारी एजाज पठाण, संतोष गिरी, इंचार्ज सिस्टर जयश्री परदेशी,अधिपरिचारिका जिजा रुंजे आदींनी परिश्रम घेतले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.