राज्यात कोरोना खरंच वाढला की औषध कंपन्यांसाठी… बाळा नांदगावकरांना संशय

राज्य सरकारच्या भूमिकेवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला संशय व्यक्त

0

मुंबई : राज्यात खरंच कोरोना वाढल्याची परिस्थिती आहे, की औषधनिर्मिती कंपन्यांसाठी काही विशेष बाब आहे, असा सवाल उपस्थित करीत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.एकीकडे नाना पटोले भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात, तर दुसरीकडे भाई जगताप लाँग मार्च काढतात. यावेळी कोरोना पसरत नाही का? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला .

एकीकडे नाना पटोले भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात, तर दुसरीकडे भाई जगताप लाँग मार्च काढतात. यावेळी कोरोना पसरत नाही का? सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे औषध कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर नाही ना, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना नांदगावकर म्हणालले की, ‘राज्यात कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती झाली आहे. ही औषधे सध्या विकली जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. मागच्या काही दिवसांचा विचार केला तर अचानक मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. ही बाब महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले आणि भाई जगताप यांना देखील सांगा, अशी माझी विनंती आहे. एकीकडे नाना पटोले भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात, तर दुसरीकडे भाई जगताप लाँग मार्च काढतात. यावेळी कोरोना पसरत नाही का’, असा सवाल त्यांनी केला. सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे औषध कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर नाही ना? कारण कोरोना काळात मोठ्या प्रमाणात औषधे निर्माण करण्यात आली आहेत. परंतु या औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे ही औषधे खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या हिताचा तर यामागे विचार नाही ना, अशा शब्दांत नांदगावकर यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.