कोरोनाने सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू, वडवनाचे दोघेही माजी सरपंच
पंचक्रोशीत राम लक्ष्मणाची जोडी म्हणून दोघा भावांना ओळखले जात
नांदेड : कोरोनाने सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना नांदेड जि्ह्यातील वडवना गावात घडली. नांदेड येथे दोघा भावांपैकी 78 वर्षीय धाकट्या भावावर उपचार सुरु होते, तर 80 वर्षीय थोरल्या भावावर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी नांदेड येथे उपचार सुरु असणाऱ्या भावाने प्राण सोडला तर काही तासातच लातूरच्या भावाने देखील अखेरचा श्वास घेतला. पंचक्रोशीत राम लक्ष्मणाची जोडी म्हणून दोघा भावांना ओळखले जात होते. त्यांच्या मृत्यूने वडवना गाव शोकसागरात बुडाले.
नांदेड जि्ह्यातील वडवना गावात कोरोनाने सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडली. दोघा भावांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. नांदेड येथे दोघा भावांपैकी 78 वर्षीय धाकट्या भावावर उपचार सुरु होते, तर 80 वर्षीय थोरल्या भावावर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवस त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी प्राण सोडले. बुधवारी सकाळी नांदेड येथे उपचार सुरु असणाऱ्या भावाने प्राण सोडला तर काही तासातच लातूरच्या भावाने देखील अखेरचा श्वास घेतला. दोघे भाऊ अतिशय शिस्तप्रिय तसंच कर्तृत्ववान होते. यातील मोठया भावाने 25 वर्ष तर धाकट्याने 10 वर्षे गावाचे सरपंचपद भूषविले होते. गावाच्या विकासासाठी दोघे भाऊ कायम आग्रही होते. गावातील कोणतंही विकासकाम करायचं म्हटले की, दोघा भावांचा विशेष पुढाकार असायचा. विशेष म्हणजे दोघांचे बंधूप्रेम पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. राम लक्ष्मणा समान असणाऱ्या या जोडीने एकाच दिवशी देहत्याग केल्याने वडवना गावावर शोककळा पसरली. ‘कोरोनाने होत्याचे नव्हते करून टाकले. आमच्या घरातील दोन कर्तबगार माणसे, अशी अचानक आम्हाला सोडून गेली. आम्ही यावर कसा विश्वास ठेवायचा’, असे म्हणत सगळे गाव राम-लक्ष्मण गेले म्हणून धाय मोकलून रडत आहे. दोघा भावांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी थोरल्या भावाला लातुरात तर धाकट्या भावाला नांदेडच्या दवाखान्यात दाखल केले होते. काही दिवस त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी प्राण सोडले.