कोरोना हा गां** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग, पुन्हा घसरले संभाजी भिडे

हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलं

0

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मास्कबाबत बोलताना शिवी हासडली. “कोरोना हा रोग नाही. कोरनाने माणसे मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठे काय विकत बसला, त्याला पोलिस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय? हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठले पाहिजे. असले हे शासन फेकून दिले पाहिजे. अजिबात उपयोगाचे नाही. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत. संपूर्ण देशात. हा मूर्खपणा सुरू आहे. कोरोना हा रोगच नाही. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडे सांगलीत बोलत होते. सांगलीतील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. यावेळी संभाजी भिडेही उपस्थित होते.

कोणत्या शहाण्याने काढला मास्कचा सिद्धांत ?

“कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असंही संभाजी भिडे म्हणाले. हातावरची माणसे उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू, दारु, दुकाने वाढवायचे काम सुरु आहे, असे संभाजी भिडे म्हणाले. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत, असे ते म्हणाले.

प्रजा भंपक आणि बावळट बनत आहे

. कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जिवाची काळजी आहे, तो घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायचे गांजा, मटका, अफू सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद, असे संभाजी भिडे म्हणाले. कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा सुरू आहे. दोन सरकार जबाबदार – जे जगायचे ते जागतील, जे मारायचे ते मारतील. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील, असेही संभाजी भिडेंनी नमूद केले. कोरोना अस्तित्वात नाही. लॉकडाऊनची गरज नाही. सरकारने काही कारू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे, असेही ते म्हणाले.

शिवसेना आमदाराला काढायला लावला मास्क 

दरम्यान, संभाजी भिडे यांनी मास्कबद्दल हे वक्तव्य पहिल्यांदाच केले असे नाही. त्यांनी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना आमदाराला मास्क काढायला लावला होता.  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते. सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तोंडावर लावलेला मास्क त्यांनी काढायला लावला. यावेळी इतर कार्यकर्ते देखील विना मास्क आढळले होते.

मास्क न लावल्यास आता 500 रुपये दंड
राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध आहेत. मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.   राज्यात सध्या वीकेंड लॉकाडऊन आहे. याशिवाय 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत सर्व बंद राहील. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येदेखील काही बदल होतील. मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.