कोरोनामुळे रखडलेल्या पोलिसांच्या बदल्यांना मिळाली गती
उद्या पोलिस आयुक्तांसमोर होणार मुलाखती
औरंगाबाद : कोरोनामुळे पोलिसांच्या रखडलेल्या बदल्याना आता गती मिळाली आहे. शनिवारी 631 कर्मचार्यांना पोलिस आयुक्त कार्यालयाच्या अभ्यागत कक्षात बोलविण्यात आले असून यावेळी पोलिस आयुक्त, कर्मचार्यांच्या विनंतीवरून बदलीविषयी इच्छित स्थळाबाबत जाणून घेणार आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून बदलीची वाट पाहणार्या कर्मचार्यामध्ये आनंदाचे वारे वाहत आहे.
एकाच ठिकाणी ज्या कर्मचार्यांचे पाच वर्षे सेवा पूर्ण झाली आहेत, अशा कर्मचार्यांची दरवर्षी मे ते जून दरम्यान होणार्या पोलिस दलातील पोलिस शिपाई ते सहायक फौजदार पदावरील कर्मचार्यांच्या नियमित बदल्या कोरोनाच्या महामारीमुळे रखडल्या. मात्र आता या बदल्याना गती मिळाली. ज्या कर्मचार्यांना विनंतीवरून बदली हवी आहे, असे शिपाई ते सहायक फौजदार पदावरील 631 पोलिस कर्मचार्यांना शनिवारी पोलिस आयुक्त कार्यालय येथे अभ्यागत कक्षात हजर राहण्याबाबत पोलिस उपआयुक्त मीना मकवना यांनी बुधवारी आदेश काढले आहे. यामध्ये 85 सहायक फौजदार, 91 पोलिस हवालंदार,147 पोलिस नाईक, पोलिस शिपाई 308 अशा प्रकारे 631 पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. शनिवारी सकाळ पासून या मुलाखती सुरू होणार असून सहाय्यक फौजदार 9.30 ते 10.30 , हवालदार 10.30 ते12.00, पोलिस नाईक 12 ते 2.00 आणि पोलिस शिपाई यांना दुपारी तीन वाजेची वेळ देण्यात आली आहे. वेळेवर उपस्थित न राहणार्या कर्मचार्यांच्या विनंतीचा विचार करण्यात येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. बुधवारी निघालेल्या बदलीविषयीच्या मुलाखती बाबत आदेशाने कर्मचार्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.