कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

दिल्लीत कोरोना प्रसाारामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय

0

नवी दिल्ली : कोरोनामुळे यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन आगामी पावसाळी अधिवेशात विलीन केले जाईल.

कोरोनामुळे यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन आगामी पावसाळी अधिवेशात विलीन केले जाईल. दिल्लीत कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणात प्रसाार होत असल्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. असल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे गेल्या सप्टेंबरमध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेच्या आठ दिवस निश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. अल्प कालावधी असूनही संसदेच्या दोन्ही सभागृहात अधिवेशनात 25 विधेयके मंजूर झाली होती. राज्य सभेत गोंधळामुळे रविवारी झालेल्या उर्वरित अधिवेशनासाठी आठ विरोधी सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांनी सलग दहा दिवस काम केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.