इंदोरीकर महाराजांच्या भाजप नेत्यांशी ‘कानगोष्टी’! चर्चेला उधाण…
इंदोरीकर महाराजांची मंचावर हितगुज ,अनेकांनी उंचावल्या भुवया
अहमदनगर : दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. इंदोरीकर महाराजांना पाहताच, अनेकांच्या भुवया उंचावल्या.
दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर इंदोरीकर महाराज मंचावर आले. त्यानंतर त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेत त्यांच्याशी गप्पा मारल्या. विशेष म्हणजे भर मंचावर इंदोरीकर आणि दानवेंनी गळाभेटही घेतली. इंदोरीकरांना कदाचित सोशल डिस्टन्सचा विसर पडला असावा आणि मास्कचा दिखावा म्हणून की, काय?… असा प्रश्न अनेकांना पडला असावा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही इंदोरीकरांनी चर्चा केली. त्यावेळी फडणवीसांनी हात जोडले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही इंदोरीकर महाराज मंचावर गुफ्तगू करत असल्याचे पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील आणि इंदोरीकर महाराज बराच वेळ एकमेकांशी संवाद साधला. त्यामुळे त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची सर्वांनाच उत्सुक्ता लागली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी संगमनेर येथील कार्यकर्मात फडणवीस आणि इंदोरीकर महाराज यांच्यात एका कार्यक्रमादरम्यान चर्चा झाली होती. यानंतर अनेकांना इंदोरीकर महाराज संगमनेरमधून विधानसभेची निवडणूक लढवतात की काय, असा प्रश्न पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप नेते आणि इंदोरीकर एकत्र चर्चा करताना दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. तसेच भाजप नेत्यांशी त्यांच्याशी नेमका काय संवाद साधला याकडे त्यांच्या नजरा लागल्या आहेत. दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.