पत्रकारांसाठी ‘संविधान प्रचारक पत्रकार कार्यशाळा’

ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली'संविधानिक पत्रकारिता'

0

वैजापूर : लोकमुद्रा संस्था व दैनिक प्रजापत्र यांच्या वतीने पत्रकारांसाठी संविधान प्रचारक कार्यशाळा झूम ऍपच्या माध्यमातून पार पडली. पत्रकारांना संविधानिक मूल्यांची ओळख व्हावी यासाठी लोकमुद्रा संस्था व दैनिक प्रजापत्र यांनी चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

‘संविधानिक पत्रकारिता’ ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. समारोप सत्रात ‘संविधानिक पत्रकारिता’ या चर्चासत्रात  नितीन ब्रह्मे व अश्विनी सातव – डोके या पत्रकारांनी विचार मांडले. महाराष्ट्रातून 45 पत्रकार यात सहभागी झाले होते. पत्रकारांना संविधानिक मूल्यांची ओळख व्हावी, यासाठी लोकमुद्रा संस्था व दैनिक ‘प्रजापत्र’ यांनी चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये संविधान निर्मितीचा इतिहास या विषयावर प्रा. प्रकाश पवार, संविधानाची प्रास्तविका याविषयावर नागेश जाधव, न्याय-स्वातंत्र्य-समता -बंधुता याविषयावर विनिता सिंग यांनी मांडणी केली.आयोजित संविधान प्रचारक कार्य शाळेत सहभागी होऊन संविधानीक मूल्य संर्वधन प्रचार प्रसार, अशा विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. औरंगाबादहून पत्रकार शांताराम मगर सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी दैनिक प्रजापत्र संपादक सुनील क्षीरसागर, संजय मालानी तर लोकमुद्रा संस्थेचे सागर भालेराव, कल्याणी माणगावे, रशीद माणियार, संदीप आखाडे यांनी  विशेष परिश्रम घेतले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.