सर्वसामान्यांना दिलासा! डाळींच्या किंमती घसरल्या, 20 टक्क्यांपर्यंत स्वस्त

लातूरमध्ये उच्च दर्जाच्या तूरडाळींची एक्स-मिल किंमत 120  किलोवरून खाली येऊन 100 रुपये किलो

0

लातूर : सर्वसामान्यांना वाढत्या महागाईमध्ये  थोडा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरमध्ये उंची गाठल्यानंतर तूर डाळीच्या किंमतींमध्ये 15 ते 20  टक्के घट झाली आहे. या दिवसात मसूर आणि चण्यासह अन्य डाळींच्या किमतीचे प्रमाण स्थिर राहिले आहे किंवा त्यात घट झाली आहे. 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सरकारने तूर आयातीसाठी मुदतवाढ जाहीर केल्यापासून लातूरमध्ये उच्च दर्जाच्या तूरडाळींची एक्स-मिल किंमत 120  किलोवरून खाली येऊन 100 रुपये किलो झाली आहे.

सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे राज्यांना तूर विक्रीदेखील सुरू केली आहे. गेल्या महिन्यात सरकारने तूरडाळ आयात करण्याचा कालावधी आणि मसूर डाळीवर कमी आयात शुल्क 31 डिसेंबरपर्यंत वाढवले होते. याशिवाय या किमती कमी करण्यासाठी आम्ही बाजारात चणा देखील उतरवला होता. तूर डाळीची मिल गेट आणि किरकोळ किंमत अनुक्रमे 120 रुपये आणि 150 रूपये प्रति किलो होती. केंद्र सरकारने नुकतेच मोजॅम्बिकसोबत पुन्हा एकदा पाच वर्षांचा तूर डाळीच्या आयातीसाठीचा करार रिन्यू केला आहे. ज्या अंतर्गत भारत दरवर्षी 2 लाख टन डाळ आयात करेल. महाराष्ट्र सरकारमधील डाळींचे प्रोसेसर नितीन कालंत्री यांनी असे म्हटले की, ‘सरकारने जारी केलेल्या विविध उपायांमुळे बाजारातील विविध भावना बदलल्या आहेत. ज्यामुळे बाजारातील डाळींची मागणी कमी झाली आहे. यामुळे किमती नियंत्रणात आणण्यात मदत झाली आहे.’ 31 डिसेंबरपर्यंत 4 लाख टन तूर डाळीची आयात करण्याची अनुमती देण्यात आली आहे. मोजॅम्बिकमधून 2 लाख टन डाळीशिवाय देशात एकूण 3.5 लाख टन डाळ आयात होण्याची अपेक्षा आहे. या दरम्यान चणाडाळ स्वस्त झाली आहे. दिवाळीमध्ये वाढलेली मागणी आणि पीएम गरीब कल्याण योजनेच्या विस्तारामुळे चणा डाळीच्या किमती वाढल्या होत्या. या महिन्यात सरकारने मसूर डाळीवर लावण्यात आलेल्या 10 टक्के कमी आयात शुल्कामध्ये देखील वाढ केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.