जनतेचे हित लक्षात… डॉक्टरांनी आंदोलन मागे घ्यावे, संजय राठोड यांचे आवाहन

कोरोनाचे संकट हे गंभीर असून या स्थितीत डॉक्टरांची सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्वाची

0

यवतमाळ  : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शिष्टमंडळासोबत चर्चा केली आहे. कोरोनाचे संकट हे अतिशय गंभीर असून आजच्या परिस्थितीत डॉक्टरांची सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन  डॉक्टरांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

कोरोनाच्या संकटात शासन-प्रशासन तसेच गावपातळीवरील सर्व यंत्रणा अतिशय जोमाने लढत आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, या आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे सर्वांची एकजूट असणे आवश्यक असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची दुपारी चर्चा करण्यात आली आहे. प्रशासन व आरोग्य विभागामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे आहे. वैद्यकीय अधिका-यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यापैकी बहुतांश मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठाम न राहता जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन शिष्टमंडळाला केल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.