काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर, सोनिया गांधींवर एकेरी भाषेत दानवेंची टीका

सोनिया गांधी यांच्यावर एकेरी भाषेत टीका; काँग्रेसनेही रावसाहेब दानवेंना दिले जोरदार प्रत्युत्तर

0

यवतमाळ :  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर काँग्रेसनेदेखील दानवेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दानवेंना प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट करावे लागतात, असा बोचरा वार केला.

“रावसाहेब दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करावी लागतात. या देशासाठी काँग्रेस पक्षाचा तसेच काँग्रेस नेतृत्वाचा त्याग केला आहे. जवाहरलाल नेहरु 13 वर्ष तुरुंगामध्ये राहिले, इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली. काँग्रेसचा इतका त्याग असताना भाजपचा देशासाठी काय त्याग आहे?”, असा सवाल करत भाजप काँग्रेसशी बरोबरी देखील करु शकत नाही, असे माणिकराव ठाकरे म्हणाले. “भाजपची भूमिका नेहमीच द्वेषाची राहिलेली आहे. देशातील विविध जातिधर्मांच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याची यांची भूमिका राहिलेली आहे. लोकांची आपापसात तंटे कसे लागतील आणि त्याचा राजकीयदृष्ट्या आपल्याला फायदा कसा होईल, हाच डाव भाजप खेळत आले आहेत, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली. दानवेंच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देण्याची गरज वाटत नाही, असे ठाकरे म्हणाले. औरंगाबादमध्ये भाजपचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी पक्षकार्यकर्त्यांसमोर बोलताना रावसाहेब दानवे काँग्रेसवर घसरले. काँग्रेस ही गांधी परिवाराची पार्टी आहे. अध्यक्षपद बदलण्यासाठी काही नेत्यांनी पत्रे दिली तर पक्षाच्या नेत्यांनाच नोटीिशी दिल्या गेल्या. आमच्या कुटुंबाला अध्यक्षपद नको म्हणायचे आणि पक्षनेत्यांना अश्या नोटिशी द्यायच्या अशा प्रकारची मानसिकता काँग्रेसची आहे, अशी सडकून टीका दानवेंनी केली. रावसाहेब दानवेंनी काँग्रेसवर टीका करताना सोनिया गांधींचा एकेरी उल्लेख केला. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारलादेखील धारेवर धरले. हे सरकार म्हणजे अमर, अकबर अँथनीचे सरकार आहे. या सरकारविरोधात आपल्याला खंबीरपणे लढा द्यावा लागेल, असे दानवे म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.