नागपूरमध्ये काँग्रेसला सुरुंग, दुष्यंत चतुर्वेदींच्या नेतृत्वात पदाधिकारी शिवसेनेत

महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षबांधणीसाठी जोरदार प्रयत्न

0

नागपूर : नागपूर महापालिकेच्या राजकारणात सध्या काँग्रेस आणि भाजप हेच दोन प्रमुख पक्ष आहेत. पण नागपुरमध्ये शिवसेना महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला सुरुंग लावत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकतेच नागपुरातील शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिंदोरे यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला आहे. आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षबांधणीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावले आहे. पण यामुळे नागपुरात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिंणगी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी पारनेरच्या पाच शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे सेनेत नाराजीनाट्य रंगले होते. महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षांत यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शेवटी त्या नगरसेवकांना शिवसेनेत परत जावे लागले होते. त्यानंतर आता राज्याच्या उपराजधानीत शिवसेना काँग्रेसला सुरुंग लावत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.