काँग्रेसकडून आंबेडकरी चळवळीतील गीतकार अनिरुद्ध वनकर यांचे नाव निश्चित?
बीडच्या माजी लोकसभा खासदार रजनी पाटील यांना राज्यसभेवर पुन्हा संधीची शक्यता
मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. काँग्रेसकडून गीतकार आणि संगीतकार अनिरुद्ध वनकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. मीरा भाईंदरमधील काँग्रेस नेते मुझ्झफर हुसैन, मुंबईतील काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि माजी खासदार रजनी पाटील या तिघांच्या नावांना काँग्रेस हायकमांडने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे. आता अनिरुद्ध वनकर यांचे नावही निश्चित मानले जाते. कोण आहेत अनिरुद्ध वनकर? अनिरुद्ध वनकर यांचं विदर्भातील साहित्य क्षेत्रात मोठे नाव आंबेडकरी चळवळीतील मोठे गीतकार आणि संगीतकार. रजनी पाटील यांना काँग्रेस राज्यसभेवर पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. रजनी पाटील या मराठवाड्यातील बीडच्या माजी लोकसभा खासदार आहेत. रजनी पाटील यांनी राज्यसभेची खासदारकी याआधीही भूषवली आहे. सध्या त्या हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी आहेत.