‘काँग्रेस नेत्यांची जनतेशी नाळ तुटली, फाईव्ह स्टार कल्चर करा बंद’; गुलाम नबी आझाद

तिकीट मिळाल्यावर पहिले फाईव्ह स्टार हॉटेल बुक, ज्या गावी रस्ते नाही तिथे हे नेते जात नाहीत.

0

नवी दिल्ली :बिहारमधील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर पक्षात विरोधाचे स्वर उमटत असून आता ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांची लोकांसोबत असलेली नाळ तुटली आहे. पक्षात फाईव्ह स्टार कल्चरही आले आहे. हे कल्चर बंद झाल्याशिवाय विजय मिळणार नाही, असे परखड मत आझाद यांनी व्यक्त केले. मी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध बोलत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आझाद म्हणाले, पक्षाच्या सततच्या पराभवाने आम्ही चिंतित आहोत. खासकरून बिहारमधील आणि इतर राज्यांमधील पोटनिवडणुकीतील पराभवानंतर ही चिंता जास्तच वाढली आहे. या पराभवासाठी पक्ष नेतृत्व हे जबाबदार नाही. मात्र त्यांनी पक्षातील नेत्यांच्या व्यवहारावर प्रश्न उपस्थित केलेत. नेते लोकांमध्ये जात नाहीत. त्यांची लोकांशी असलेली नाळ तुटली आहे. तिकीट मिळाल्यानंतर सगळ्यात पहिले फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले जाते. ज्या गावी रस्ते नाहीत तिथे हे नेते जात नाहीत. असाच व्यवहार राहिला तर निवडणुका कशा जिंकता येतील, असा सवालही त्यांनी केला. तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बलांवर हल्लाबोल केला. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सिब्बल यांच्यावर जोरदार टीका केली. अशा वाचाळ नेत्यांमुळेच पक्षाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरगे म्हणाले, सगळ्यांनी एकत्र येत निवडणूक लढली होती. मात्र पराभवानंतर काही नेते हे नेतृत्वाला दोष देत आहेत हे योग्य नाही. अशा काळात सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. अशा वक्तव्यांमुळे आणि नेत्यांमुळे पक्षाचे नुकसान होते. पक्ष कमकूवत बनतो असंही ते म्हणाले. काँग्रेसची विचारधारा नष्ट झाली तर आपण सगळेच संपून जाऊ असेही ते म्हणाले. या मुलाखतीमध्ये कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. परिस्थिती आता हाताबाहेर गेली असून आत्मचिंतन करण्याची वेळही निघून गेल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या मुलाखतीनंतर राहुल गांधी यांचे समर्थक आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बल यांच्याविरुद्ध हल्लाबोल केला आहे. उगाच फुकटचे सल्ले देण्यापेक्षा अशा नेत्यांनी काँग्रेस सोडून जावे, अशी टीका काँग्रेसचे ज्येठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.