शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आज काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने!

जळगावात काँग्रेस आणि भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

0

जळगाव : एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खडसेंनी जळगाव भाजपला खिंडार पाडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अशा स्थितीत आज जळगावात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत.

खडसेंनी जळगाव भाजपला खिंडार पाडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अशा स्थितीत आज जळगावात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत. महत्वाची बाब म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे दोन्ही पक्ष आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत आहेत. भाजपकडून शेतकऱ्यांच्या विमा प्रश्नावरुन राज्य सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. तर काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाजपकडून सकाळी 11 वाजता हे आंदोलन करण्यात  आले. तर काँग्रेस दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. त्यामुळे जळगावात आज एकाच दिवशी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे भाजप केंद्रात सत्तेवर आहे. तर काँग्रेस राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा सत्तेतील सहकाही पक्ष आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.