काँग्रेस नगरसेविकेची कथित घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार

सफाई कर्मचारी ठेक्यातील गैरव्यवहार पंतप्रधानांकडे धाव, चर्चेचा विषय, भाजपची कोंडी

0

नाशिक : नाशिकमधील काँग्रेसच्या नगरसेविकेने एका कथित घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्याने महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपासून सफाई कामगारांच्या ठेक्याचा विषय नाशिकमध्ये चांगलाच चर्चेत असताना आणि हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच काँग्रेसच्या नगरसेविका तथा प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करत तक्रार केली.

महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपासून सफाई कामगारांच्या ठेक्याचा विषय नाशिकमध्ये चांगलाच चर्चेत असताना आणि हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच काँग्रेसच्या नगरसेविका तथा प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करत तक्रार केली. या तक्रारीत हेमलता पाटील यांनी म्हणाले की “तुम्ही सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला होता. मात्र नाशिकमध्ये याच सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांचा यात हात आहे. महापालिकेत ठेकेदारामार्फत 700 सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना 27 हजार प्रतिमाह देणे अपेक्षित असताना, त्यांच्या बँक खात्यातून ठेकेदार 16 हजार रुपये कपात करून कर्मचाऱ्यांना 11 हजार 500 रुपये एवढेच वेतन देत असून अशाप्रकारे दरमहा एक कोटी 85 लाख रुपयांचा गैरव्यवहार होत आहे. तुम्हाला भ्रष्टाराचाची खूप चीड आहे, मात्र येथे सरळ सरळ अशाप्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे.”
हेमलता पाटील यांनी यापूर्वी स्मार्ट सिटीतील अनागोंदी कारभाराविषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मात्र आता त्यांनी थेट मोदींकडे स्मार्ट सिटी आणि सफाई कर्मचारी ठेक्यातील गैरव्यवहाराविषयी धाव घेतल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरला असून भाजपची यामुळे मोठी कोंडी झाली आहे. पाटील यांच्याकडून केल्या गेलेल्या आरोपांबाबत महापौरांची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता त्यांनी यावर बोलण्यास टाळाटाळ केली. एकंदरीतच हेमलता पाटील यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची पंतप्रधान कार्यालयाकडून आता कशाप्रकारे दखल घेतली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.