निवडणूक आयोगाकडे भाजप, महाविकास आघाडी, मनसेच्या उमेदवारांविरोधात तक्रार

या तिन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप

0

पुणे :  पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या भाजप, मनसे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार पुणेस्थित वकील अभिषेक हरिदास यांनी केली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या भाजप, मनसे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती पुरवल्याचा आरोप हरिदास यांनी केला आहे. राज्यात पुणे पदवीधर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या पक्षाचे नेते आपल्या उमेवाराच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र, पुणे पदवीधर मतदरसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख आणि मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील वकील अभिषेक हरिदास यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीत या तिन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तिन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरताना माहितीपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप हरिदास यांनी केला आहे.

पुणे पदवीधरमधून 16 जणांची माघार
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी 16 अर्ज मुदत संपेपर्यंत मागे घेण्यात आले. त्यामुळे आता पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्षांच्या 13 उमेदवारांसह एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. तर, प्रमुख लढत राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यामध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांना ठार मारण्याची धमकी

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना ठार मारण्याची शनिवारी (21 नोव्हेंबर) धमकी देण्यात आली होती. आमदार होण्याची स्वप्नं पाहू नकोस, मारुन टाकीन, अशा शब्दात साताऱ्यातून फोन करत एका अज्ञात व्यक्तीने पाटील यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर पाटील यांनी अज्ञाताविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल केलीआहे.

पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार
अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
संग्राम देशमुख (भाजप)
रुपाली पाटील ( मनसे )
शरद पाटील ( जनता दल )
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.