‘बार्टी’कडून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे थकले विद्यावेतन, त्यांच्यावर आमरण उपोषणाची वेळ

विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी विद्यार्थ्यावंर आली अभ्यास सोडून उपोषणाची वेळ

0

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे(बार्टी) यांच्याकडून विद्यावेतन दिले जाते. औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी विद्यार्थ्यांवर अभ्यास सोडून उपोषणाची वेळ आली.

एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. विद्यावेतनाचा प्रश्न सोडवा, याकरिता विद्यार्थ्यांनी औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी विद्यावेतन त्वरित मिळावे, यासाठी आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. याचाही फटका विद्यार्थ्यांना अभ्यास करताना बसला. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमधून सावरुन पुन्हा अभ्यासाच्या तयारीला लागत असतानाच विद्यावेतनाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्याने विद्यार्थ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार लांबणीवर

कोरोना विषाणू ससंर्गामुळे 26 एप्रिल ते 10 मे रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर 11 ऑक्टोबरला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेनुसारच घ्या, अशी मागणी राज्यातील ओबीसी नेत्यांनी केली होती. मात्र, त्यांचा विरोध डावलून 11 ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षा पुढे ढकलून अन्य समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही का? असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.