राष्ट्रवादीच्या कार्यालयात या, सरकारच्या कामांचा ग्रंथ वाचायला…; मिटकरींचा फडणवीसांवर पलटवार

सरकारने काय केले?, हे विचारण्याचा देवेंद्र फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही- अमोल मिटकरी

0

मुंबई : “राज्य सरकारच्या वर्षभरातील कामांचा एक ग्रंथ आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावे. त्यांना तो ग्रंथ वाचायला देतो.” असा घणाघाती पलटवार राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त (28 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त (28 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले.“महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र सरकारची अॅचिव्हमेंट काय आहे?” असा सवाल फटणवीस यांनी केला होता. त्या प्रश्नाला अमोल मिटकरी यांनी वरील उत्तर दिले. “महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. सरकारमधील सर्व मंत्र्यांनी चांगले काम केले. सरकारने वर्षभरात महात्मा फुले कर्जमाफी योजना, शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत, कोरोना काळात शिवभोजन थाळी, अशा अनेक योजना राबवल्या. राज्य सरकारच्या वर्षभरातील कामांचा एक ग्रंथ आहे. देवेंद्र फडणवीस यांना वेळ भेटला तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावे. त्यांना तो ग्रंथ वाचायला देतो,” असे अमोल मिटकरी म्हणाले.

फडणवीसांना नैतिक अधिकार नाही
देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर प्रश्न निर्माण केल्यानंतर मिटकरी यांनी फडणवीसांना लक्ष्य केले. “सरकारने काय केले?, हे विचारण्याचा देवेंद्र फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. कारण, फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही,” असा दावा मिटकरी यांनी केला. तसेच, यावेळी महाविकास आघाडी सरकार हे पूर्ण पाच वर्षे टिकेल, असा दावाही त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? कोरोना काळातील भ्रष्टाचार उघडा पाडणार- फडणवीस

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. इतकेच नाही तर कोरोना संकटाच्या काळात करण्यात आलेल्या उपायोजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. हा भ्रष्टाचार उघडा पाडण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

धमकावणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही- फडणवीस

“महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी ‘सामना’ला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचे व्हिजन आवश्यक होते, मात्र ते दिसलेच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो. पण दसरा मेळाव्याचे भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचे दिसून आले”, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.