मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन : ‘पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका’

नियंत्रणात असणारी परिस्थिती पुन्हा चिंतेत टाकणाऱ्या वळणावर

0

मुंबई :  रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या मुद्दयांना अनुसरुन जनतेला संबोधित केले. मेट्रो कारशेड, सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा येथपासून ते राज्यातील शेतकरी आणि कोरोना परिस्थितीबाबतही त्यांनी वक्तव्य केले.

कोरोनाशी दोन हात करत असताना सर्वांनी काळजी घ्यायचीच आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. ‘कोरोना अजून आपल्यातून गेलेला नाही. जगात काही देशांत, तर याची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागणार आहे’, असे म्हणत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाची जनतेप्रति असणारी जबाबदारी अधोरेखित करत जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कोरोनाचा संसर्ग असतानाही टप्प्याटप्प्याने अनलॉक करत अनेक सुविधा आणि सेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली. पण, अनेक ठिकाणी असे होत असतानाच कोरोनाचा मात्र विसर पडल्याचे भीषण चित्र पाहावयास मिळाले. परिणामी काहीअंशी नियंत्रणात असणारी परिस्थिती पुन्हा चिंतेत टाकणाऱ्या वळणावर आली. राज्यातील अशाच परिस्थितीवर भर देत आणि संकट टळलेले नाही, हेच पुन्हा सांगत सुरु केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शिवाय मुख्यमंत्र्यांनी जनतेला लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, आरोग्य सांभाळा असे आवाहनही केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.