वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे’स्वच्छता अभियान’ सुरू
या अभियानात महिंद्रा अँड महिंद्रा 'कंपनीचे मुख्य व्यस्थापक शैलेश चांदेकर यांची प्रमुख उपस्थिती
औरंगाबाद : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कचरा व्यवस्थापन करणारी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी यांच्या तर्फे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यांच्या स्वच्छता अभियानाला ता. १७ डिसेंबर २०२० रोजी एफडीसी चौकापासून मसिआचे सचिव राहुल मोगले यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मुख्य व्यस्थापक शैलेश चांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनचे काम करण्याऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने या अभियानाला एफडीसी चौकापासून सुरुवात केली आहे. यानंतर सर्वच सेक्टरमध्ये रस्ते स्वच्छता अभियान राबवले जाणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे सांगण्यात आले. सर्व उद्योजकांनी या अभियानस सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मसिआचे सचिव राहुल मोगले, सह सचिव अब्दुल शेख, कार्यकारिणी सदस्य अनिल पाटील , महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य व्यस्थापक शैलेश चांदेकर,
समन्वयक अधिकारी चौहान व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती. लवकरच संपूर्ण वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सर्व रस्ते स्वच्छ , सुंदर होतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.