अहमदनगरध्ये सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या मार्गदर्शक सूचना

0

अहमदनगर : राज्यात येत्या सोमवारपासून (23 सप्टेंबर) नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार अहमदनगरध्ये सोमवारपासून  नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.

सोमवारपासून (23 सप्टेंबर) नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार अहमदनगरध्ये सोमवारपासून  नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबत अधिसूचना जारी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागदर्शक सूचनादेखील जारी केल्या आहेत.  दरम्यान, “शाळा सुरु करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करावा. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा”, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. त्यानंतर अहमदनगरमधील शाळा सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.