‘शाही मशिद’ जमिनीसह परिसरावर दावा, श्रीकृष्ण विराजमान यांची याचिका मंजूर

जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डासह चार पक्षांना पाठवली नोटीस

0

मथुरा  : मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी वादावर श्रीकृष्ण विराजमान यांची याचिका शुक्रवारी न्यायालयाने मंजूर केली. 12 अक्टोबरला श्रीकृष्ण विराजमान यांच्याकडून जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेमध्ये परिसरात अतिक्रमण करुन शाही ईदगाह मशीद बनवण्याचा आरोप करण्यात आला आहे. शाही मशिदीच्या जमिनीसह 13.37 एकर परिसरावर दावा करत मालकी हक्क मागितला आहे.

जिल्हा न्यायालयाने  शुक्रवारी याप्रकरणी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डासह 4 पक्षांना नोटीस पाठवली. पुढील सुनावणी 18 नोव्हेंबर रोजी होईल. श्रीकृष्णा विराजमान यांचे वकील हरीशंकर जैन यांनी सांगितले की, वक्फ बोर्डाशिवाय शाही मस्जिद ईदगाह ट्रस्ट, श्री कृष्णा जन्मभूमी ट्रस्ट, श्री कृष्णा जन्मस्थान सेवा संस्थान यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याचिकाकर्ते रंजना अग्निहोत्री यांनी सांगितले की, 25 सप्टेंबर रोजी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 30 सप्टेंबर रोजी दिवाणी न्यायाधीशांनी आमचे प्रकरण फेटाळून लावले. त्यानंतर न्यायालयाने म्हटले होते की, जर आमचे प्रकरण भक्त म्हणून मंजूर झाले तर न्यायालयीन व्यवस्था कोलमडेल. या आदेशानंतर जिल्हा न्यायालयात अपील केले. आम्ही जे ग्राउंड दिले होते, त्याच्या आधारावर जिल्हा न्यायालयाने आमची अपील मंजूर केले आहे. रंजना अग्निहोत्री यांनी सांगितले की, ज्या जागेवर शाही ईदगाह मशीद उभी आहे, त्या ठिकाणी कारागृह होते, जेथे श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. ही याचिका श्रीकृष्णा विराजमान, स्थान श्रीकृष्ण जन्मभूमी कटरा केशवा देव केवट, रंजना अग्निहोत्री, प्रवेश कुमार, राजेश मणि त्रिपाठी, करुणेश कुमार शुक्ला, शिवाजी सिंह, त्रिपुरारी तिवारी यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे.

वाद काय आहे आणि 1968 मध्ये काय करार झाला?

1951 मध्ये श्री कृष्णा जन्मभूमी ट्रस्टची बनवून ठरवण्यात आले की, तेथे पुन्हा भव्य मंदिराची निर्मिती होईल आणि ट्रस्ट त्याचे प्रबंधन करेल. यानंतर 1958 मध्ये श्री कृष्ण जन्म स्थान सेवा संघ नावाची संस्था स्थापन झाली. कायदेशीररित्या या संस्थेला जमिनीवर मालकी हक्क नव्हता. मात्र याने ट्रस्टसाठी ठरवलेली सर्व भूमिका निभावणे सुरू केल्या. या संस्थेने 1964 मध्ये संपूर्ण जमिनीवर नियंत्रणासाठी एक सिव्हील याचिका दाखल केली, मात्र 1968 मध्ये स्वतःच मुस्लिम पक्षासोबत समझोता केला. यानुसार मुस्लिम पक्षाने मंदिरासाठी आपल्या ताब्यातील काही ठिकाणे सोडले आणि त्यांना (मुस्लिम पक्षाला) त्याच्याजवळची जागा दिली. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद 13.37 एकरांत बनली आहे. यामध्ये 10.50 एकर भूमीवर वर्तमानमध्ये श्रीकृष्ण विराजमान यांचा ताबा आहे. मात्र याचिकाकर्त्यांनी संपूर्ण जमिनीचा मालकी हक्क मागितला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.