शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हाथरस घटनेचा निषेध, आज सत्याग्रह आंदोलन

हाथरस येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाचे देशभर पडसाद

0
औरंगाबाद  : उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचा निषेध करीत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सत्याग्रह आंदोलन केले.यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले आहेत. विविध संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने सुरू केली आहेत. या घटनेचा निषेध म्हणून आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी योगी सरकार बरखास्त करा, दोषींना फाशीवर लटकवा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, युवक काँग्रेसचे जितेंद्र देहाडे, अरुण शिरसाट, अजय वाघमारे, इब्राहिम पठाण, सुभाष देवकर, गुलाब पटेल, अ‍ॅड. पवन डोंगरे, महिला काँग्रेसच्या सरोज मसलगे, सुरेखा पानकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.