सिडकाे एन-7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे 74 वा स्वातंत्र दिन उत्साहात

संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनवणे  आणि मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहन

0

औरंगाबाद : सिडकाे एन-7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर  येथील ज्ञान संदीप शिक्षण संस्था  संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूल यांच्या वतीने भारताचा 74वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सिडकाे एन-7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर  येथील ज्ञान संदीप शिक्षण संस्था  संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूल यांच्या वतीने भारताचा 74 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनवणे  व मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.  तसेच संस्थेच्या सचिव  संगीता खिल्लारे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव शिंदे यांनी केले.   इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कोविंड19 च्या महामारी व स्वतंत्र दिनाच्या विषयावर संस्थेचे संस्थापक प्रकाश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. सुनील चौधरी, नाझिमा खाँन,संजिव चौधरी,एस.जी.खिल्लारे, एस.पी.सोनवणे, कमल खरात यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

 

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.